積分
演出藝人
Mahendra Kapoor
演出者
詞曲
Bal Palsule
作曲
Jagdish Khebudkar
詞曲創作
歌詞
इंद्रधनूच्या कमानीतुनी
इंद्रधनूच्या कमानीतुनी
अवतरली खाली
अवतरली खाली
अप्सरा स्वर्गातून आली
अप्सरा स्वर्गातून आली
पदन्यास हे झंकाराचे
कोरिव लेणे शृंगाराचे
पदन्यास हे झंकाराचे
कोरिव लेणे शृंगाराचे
जणू सांज ही
रविकिरणांच्या तेजाने न्हाली
अप्सरा स्वर्गातून आली
अप्सरा स्वर्गातून आली
जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहाळसी का तनू देखणी?
जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहाळसी का तनू देखणी?
नजर बोलता लाज अशी का
साज नवा ल्याली?
अप्सरा स्वर्गातून आली
अप्सरा स्वर्गातून आली
अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी
अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी
स्वप्नमयूरी आज प्रियाला
साद जणू घाली
अप्सरा स्वर्गातून आली
अप्सरा स्वर्गातून आली
Written by: Bal Palsule, Jagdish Khebudkar