Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Jaywant Kulkarni
Jaywant Kulkarni
Performer
COMPOSITION & LYRICS
Shanta Shelke
Shanta Shelke
Songwriter

Lyrics

ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली इथं कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोनांत हास ना तू जरा मा़झ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना तू लगबग जाता, मागे वळुन पहता वाट पावलांत अडखळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली उगाच भुवई ताणून, फुकाचा रुसवा आणून पदर चाचपुन हातानं, ओठ जरा दाबीशी दातानं हा राग जीवघेणा, खोटा खोटाच बहाणा आता माझी मला खूण कळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली
Writer(s): Shanta Shelke, Devdatta Sable Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out