Lyrics

अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला स्पर्श सोनेरी, गंध कस्तुरी, बंध रेशीम भासे ही अशी एकुलती एक एकुलती एक बोलकी-बोलकी अन कधी शांत ही चांद रातीतला रम्य एकांत ही बोलकी-बोलकी अन कधी शांत ही चांद रातीतला रम्य एकांत ही हळुच हासे ही, स्वप्न भासे ही, पालवी लाजरी ही अशी एकुलती एक ही अशी एकुलती एक पावलो-पावली बस तिची सावली मी तिच्या अंतरी, तीच माझ्यातही पावलो-पावली बस तिची सावली मी तिच्या अंतरी, तीच माझ्यातही राग फसवा हा, गोड रुसवा हा, थोडीशी बावरी ही अशी एकुलती एक ही अशी एकुलती एक अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला स्पर्श सोनेरी, गंध कस्तुरी, बंध रेशीम भासे ही अशी एकुलती एक एकुलती एक
Writer(s): Nida Fazli, Tim Rice, John Barry, Talat Aziz Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out