Lyrics

पेटलं आभाळ सारं, पेटला हा प्राण रे उठला हा जाळ आतून, करपलं रान रे उजळतांना जळून गेलो, राहीलं ना भान डोळ्यातल्या पाण्याने ही विजे ना तहान (तहान) दूर-दूर चालली आज माझी सावली दूर-दूर चालली आज माझी सावली कशी सांज ही, उरी गोठली उरलो, हरलो, दुखः झाले सोबती उरलो, हरलो, दुखः झाले सोबती काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला मी इथे अन तो तिथे, हा खेळ आता संपला मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा अपुलाचं तो रस्ता जुना अपुलाचं तो रस्ता जुना मी एकटा चालू किती? उरलो, हरलो, दुखः झाले सोबती उरलो, हरलो, दुखः झाले सोबती ना भरवसा, ना दिलासा, कोणता केला गुन्हा? जिंकुनी ही खेळ सारा, हारते मी का पुन्हा? (हारते मी का पुन्हा?) त्रास लाखो, भास लाखो, कोणते मानू खरे? कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर काच रे (ह्या मनावर काच रे) समजावतो मी या मना समजावतो मी या मना तरी आसवे का वाहती? उरलो, हरलो, दुखः झाले सोबती उरलो, हरलो, दुखः झाले सोबती
Writer(s): Amit Raj, Ashwini Shende Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out