Lyrics

नाही खर्चली कवडी, दमळी नाही वेचला दान विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम कुणी म्हणे, ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी कुणी म्हणे, ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतके मोजीयले हरी नाम, मोजीयले हरी नाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम, दासाचा श्रीराम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम जितके मालक, तितकी नावे जितके मालक, तितकी नावे हृदये तितकी याची गावे कुणी ना ओळखी तरीही याला दीन-अनाथ, अनाम, दीन-अनाथ, अनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out