Lyrics

जय जय सद्गुरू गजानना, रक्षक तूचि भक्तजना निर्गुण तु, परमात्मा तु, सगुण रुपात गजानन तु सदेह तु, परी विदेह तु, देह असून देहातीत तु माघ वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तंव हो प्रगट बंकट लालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तंव पद तीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला जानकीरामा चिंचवणे नासवोनी स्वरूपी आणणे मुकीन चंदूचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना, केले देवा जल भरणा मध माश्यांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगबले काढुन सहजी दाखविले कुस्ती हरीशी खेळोनि, शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणुनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रम्हगिरीला ये प्रचीती टाकळीकर हरिदासाचा अश्व शांत केला साचा बाळकृष्ण बाळापुरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देवूनी तोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तु निरवी दांभिकता परी ती त्याची तु न चालवुनी घे साची भास्कर पाटील तंव भक्त उद्धरलासी तु त्वरित आज्ञा तव शिरसावंद्य, काकही मानती तुज वंद्य विहिरीमाजी रक्षियला देवा तु गणू जवऱ्याला पितांबरा करवी लीला वठला आंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोश्याला, माफ करी तो दंडाला सवडद येथील गंगाभारती थुंकूनी वारिली रक्तपिती पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणूनी केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तूचि पाठविला कवर सुताची कांदा-भाकर भक्षीलीस तु प्रेमाखातर नग्न बैसोनी गाडीत लीला दाविली विपरीत पाय जे चित्ती तव भक्ती पुंडलीकावरी विरक्त प्रीती बापुरा मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तु विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासुनी वाचविला वासुदेव यती तुज भेटे प्रेमाची ती खुण पटे उद्धट झाला हवालदार, भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही कितीजणा अनुभव येई पडत्या मजूरा झेलीयेले बघती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्री वांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला शरण जाऊनी गजानना दुःख तयाते करी कथना कृपा करी तो भक्तांसी धावून येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी-मनी ५२ गुरुवारी नेमे करा पाठ बहु भक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी, संकटातूनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता-बघता भक्त बोले, "जय बोला, गजाननाची जय बोला जय बोला, हो, जय बोला, गजाननाची जय बोला" अनंत कोटी ब्रम्हांडनायक, महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय
Writer(s): Subhash Jena Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out