album cover
Susangati
album cover
00:00
00:15
00:30
02:20
00:00
02:26
Past 7 Days
Susangati was discovered most frequently at around 15 seconds into the song during the past week

Lyrics

(म्हणा सगळ्यांनी)
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंग्रीकमळी दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंग्रीकमळी दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो
ROAR सोबत मी केले किती कांड
नव्हतं जमत rap, तरी केला start
घाण boot'an वर polish केला art
पाच वर्षांनी भेटला आज प्रतिसाद
बालपणीतले मित्र भेटतात आजपण
मस्करी-मस्करीत खेचतात आजपण
दणदणीत गणपतीत नाचतात आजपण
लहानपणातील संगत नाही विसरत आजपण (-सर्वथा नावडो)
मी हट्टी पोरगा, कोणाला नाही ऐकत
नातेवाईक बोलतात, "ह्याला नाही शिस्तच"
"वाया गेला", बोलतात, उडवतात चिखल
ह्यांच्या बोलण्यानी माझ्या घरी भाकरी नाही शिजत
काढतात इज्जत
बोलतात, "बोलतो तुझ्या आम्ही भल्यासाठी"
मी किती झिजलो ह्या कलेसाठी
माझी संगत vibe, मला नको नाती
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंग्रीकमळी दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो
ROAR ची कला ही dope
स्वप्नांनी उडवली झोप
कलम ही शब्दाची तोफ
नकली rappers ला नाक्यावर चॉप
मी सत्ताधारी, सगळ्यांवर भारी
Equality ची खुद्दारी, पोरींनी कधी साफ केल्यात गटारी?
माझा स्वभाव grounded
तू जमीनदोस्त, that's ground-dead
तू शिक्षण जेव्हा होता घेत
मी शिक्षण तेव्हा होतो देत
ही लिखाई सरस्वतीची भेट
तो परीक्षा पाहे
ROAR त्याचा घाम वाहे
मग आकाश झाले ठेंगणे
प्रेक्षकांच्या ओठांवर गाणे
"वेळ आला, पालटले माझे नाणें", आई म्हणे
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदंग्रीकमळी दडो मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो
Written by: Aniket Kiran Rode, Parag Vinod Deshmukh, Prathamesh Ramesh Rane
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...