Lyrics

भातुकलीच्या खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राजा वदला, "मला समजली शब्दांवाचुन भाषा" राजा वदला, "मला समजली शब्दांवाचुन भाषा" माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनी आले पाणी? अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राणी वदली बघत एकटक दूर-दूरचा तारा राणी वदली बघत एकटक दूर-दूरचा तारा "उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा" "दुज्या गावचा वारा" पण राजाला उशिरा कळली पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी तिला विचारी राजा "का हे जीव असे जोडावे?" तिला विचारी राजा "का हे जीव असे जोडावे?" "का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?" तिला विचारी राजा "का हे जीव असे जोडावे?" "का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?" या प्रश्नाला उत्तर नव्हते या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी का राणीने मिटले डोळे? दूर-दूर जाताना का राणीने मिटले डोळे? दूर-दूर जाताना का राजाचा श्वास कोंडला? गीत तिचे गाताना गीत तिचे गाताना वाऱ्यावरती विरून गेली वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी
Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out