Lyrics

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे-हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली? रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली? काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठांतून बाळाच्या चिमण्या ओठांतून हाक बोबडी येते बाळाच्या चिमण्या ओठांतून हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजणासाठी नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्र्व तरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out